Durga-Mata-Download-Free-Hindu-Devi.jpg

नवरात्र पूजा विधी    -सौ जयश्री काजरेकर

              

आचमन -

  दोनदा आचमन करावे. भगवान श्रीविष्णूच्या चोवीस नावांपैकी पहिली तीन नावे उच्चारुन एकेक आचमन करावे.

त्यानंतर हात धुऊन चौथ्या नावापासून पुढील नावे हात जोडून म्हणावीत.

ॐ केशवाय नम: । ॐ नारायणाय नम: । ॐ माधवाय नम: । ॐ गोविंदाय नम: । ॐ विष्णवे नम:।

ॐ मधुसूदनाय नम: । ॐ त्रिविक्रमाय नम: । ॐ वामनाय नम: । ॐ श्रीधराय नम: । ॐ हृषीकेशाय नम: ।

ॐ पद्मनाभाय नम: । ॐ दामोदराय नम: । ॐ संकर्षणाय नम:। ॐ वासुदेवाय नम: । ॐ ॐप्रद्द्युम्नाय नम: ।

ॐ अनिरुध्दाय नम: । ॐ पुरुषोत्तमाय नम: । ॐ अधोक्षजाय नम: । ॐ नारसिंहाय नम: । ॐ अच्युताय नम: ।

ॐ जनार्दनाय नम: । ॐ उपेन्द्राय नम: । ॐ हरये नम: । ॐ श्रीकृष्णाय नम: ।

 

प्राणायाम -

  प्राणायाम करताना म्हणावे -

  ॐ प्रणवस्य परब्रम्ह ऋषि :। परमात्मा देवता । दैवी गायत्री छंद: । गायत्र्या गाथिनो विश्वामित्र ऋषि : । सविता देवता । गायत्री छंद: । प्राणायामे विनियोग: । ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यम्‍ ॥

ॐ भूर्भुव: स्व: । ॐ तत्सवितुर्वरेण्यम्‍ । भर्गो देवस्य धीमहि । धियो यो न: प्रचोदयात्‍ । ॐ आपोज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम ‍

 

देवादिकांना वंदन –

 

श्रीमन्महागणाधिपतये नम: । श्री सरस्वत्यै नम: । श्री गुरुभ्यो नम:। वेदाय नम: । वेदपुरुषाय नम: ।

इष्टदेवताभ्यो  नम: । कुलदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम:।वास्तुदेवताभ्यो नम: ।

  शचीपुरंदराभ्यां नम: । उमामहेश्वराभ्यां नम: । श्री लक्ष्मी नारायणाभ्यां नम: ॥

  कालकामपरशुरामेभ्यो नम: । मातृपितृभ्यां नम: । आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नम:।

  सर्वेभ्यो ब्राम्हणेभ्यो नम: । उपस्थितसर्वलोकेभ्यो नम: । एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नम: ॥ अविघ्नमस्तु ॥

 

प्रार्थना -

आरंभलेली पूजा निर्विघ्न पणे पार पडावी यासाठी गणपती,सरस्वती , ब्रम्हा-विष्णू-महेश, गुरुदेव इत्यादींना हात जोडून प्रार्थना करावी .

  वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।१॥

  या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता । या वीणा वर दण्ड् मंडित करा या श्वेतपद्मासना  या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिदैवै: सदा वंदिता । सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्या पहा ॥२॥

  गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: । गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्रीगुरुवे नम: ॥३॥

  सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाम मंगलम्‍ । येषां हृदिस्थो भगवान मंगलायतनं हरि: ॥४॥

  तदेव लग्नं सुदिनं तदेव । ताराबलं  चंद्र  बलं तदेव विद्याबलं दैव बलं तदेव । लक्ष्मीपते तेङघ्रियुगं स्मरामि ॥५॥

  सर्वेष्वारब्ध्कार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा: । देवा दिशन्तु न: सिध्दि ब्रह्मोशानजनार्दना: ॥६॥

 

देशकालादिंचे उच्चारण -

  ॐ श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य  ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे,श्रीश्वेतवाराहकल्पे

  वैवस्वतमन्वन्तरे ,  अमेरिका खंडे , कॅनडा  प्रदेशे , जंबुद्विपे  --  --क्षेत्रे गोदावर्या: ( दक्षिणे। उत्तरे ) तीरे, कलियुगे । कलिप्रथमचरणे। अष्टविंशति तमे  युगे ।

  बौद्बावतारे । शालिवाहन शके । ... नाम + संवत्सरे । दक्षिणायने । शरदऋतौ ।

  आश्विनमासे शुक्लपक्षे... तिथौ ... + वासरे + अद्य .... दिवस नक्षत्रे + विष्णुयोगे विक्ष्णुकरणे ..... + स्थिते वर्तमाने चन्द्रे ।

  .... स्थिते श्रीसूर्ये । .... स्थिते देवगुरौ ग्रहेषु यथायथं राशि  स्थान स्थितेषु सत्सु एवंगुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ ।

  + जे दिनमान असेल त्याचे उच्चारण करावे

 

संकल्प -

  ममं आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थ, अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां क्षेम- स्थैर्य-विजय - अभय - आयुरारोग्य- ऐश्वर्याभिवृध्दयर्थ

  द्विपद-चतुष्पादानां शांत्यर्थ: पुष्ट्यर्थ तुष्टुयर्थं । समस्त मंगलावाप्त्यर्थ। समस्त दुरितोपशांत्यर्थ । समस्ताभ्युदयार्थ च इष्टकामसंसिध्दयर्थ ।

  कल्पोतफलावात्प्यर्थ । ... मम सहकुटुंबस्य त्रिगुणात्मका श्रीदुर्गाप्रीतिद्वारा सर्वापशांतिपूर्वक दीर्घायुधर्न - पुत्रदिवृध्दि - शत्रुपराजय - कीर्तिलाभ- प्रमुख - चतुर्विध- पुरुषार्थ - सिध्दयर्थ - अद्यारंभ्य नवमीपर्यंत महाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती नवदुर्गा प्रीत्यर्थ

  मालाबंधनं अखंड दीपप्रज्वलनपूर्वकं

  कुलाचार असेल त्याप्रमाणे उच्चारावे -

 

चंडिकास्तोत्र -

  तन्मंत्र जप- ब्राम्हणकुमारी पूजन-उपवास-नक्तैभुक्तान्यतम-नियमादिरुपं नवरात्रपूजां करिष्ये ।

  तदंगत्वेन प्रतिपदा विहितं कलश स्थापनादि करिष्ये ।

  (असे म्हणून उजव्या हातात पळीने पाणी घेऊन ताम्हनात सोडावे. पूजेच्या वेळी प्रज्वलित केलेला हा दीप नऊ दिवस अखंड तेवत ठेवावा. )

तथाच आसनादि कलश-शंख - घंटापूजनं - दीपपूजनं करिष्ये । शरीरशुध्दयर्थ ( श्रीपुरुषसूक्तेन ) षडंगन्यास च करिष्ये । आदौ निर्विघ्नतासिध्दयर्थ श्रीमहागणपतिपूजनं करिष्ये ।

  (असे म्हणून उजव्या हाताने ताम्हनात पळीभर पाणी सोडावे.)

 

श्रीमहागणपति पूजन -

  श्रीगणपतीचे प्रतीक म्हणून तांदुळ किंवा गहू यांच्या छोट्याशा राशीवर नारळ किंवा सुपारी ठेवावी किंवा

  श्रीगणपतीची छोटीशी मूर्ती ठेवावी त्यावर गंध,अक्षता इ फु्ले वाहून पूजा करावी.

  ' सकलपूजार्थे गंधाक्षतापुष्पं समर्पयामि'।

 

  नमस्कार करावा, नंतर म्हणावे -

  गणानां त्वा शौनको गृत्समदो गणपतिर्जगती । गणपत्यावाहने विनियोग: ।

ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे । कविं कवीनामुपमश्रवस्तमम‍। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन: । शृण्वन नूतिभिं: सीदसादनं ।

  श्रीमन्महागणपतये नमो नम: । श्रीमहागणपत ये  नम: आवाहनं समर्पयामि ॥

  गणपतीवर अक्षता वाहाव्या. नंतर आसन - अर्ध्य इत्यादी उपचार अर्पण करावे.

 

  दोन पानांवर सुपारी ठेवून दक्षिणा अर्पण करावी. गणपतीची  पूजा पूर्ण झाल्यावर

  'कार्य मे सिध्दिमायातु प्रसन्ने त्वयि धातारि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक  । '

  अशी प्रार्थना करावी आणि

  ' श्रीमहागणपतये नमो नम: ।'

  असे म्हणून हात जोडावे.

 

आसन व वातावरणशुध्दी _ ॐ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुनां धृता । त्वं च धार य मां देवि पवित्र कुरु चासनं ॥१॥

  अपक्रामन्तु भूतानि पिशाचा: सर्वतो दिशम्‍ सर्वेषाम विरोधेन पूजाकर्म समारभे ॥२॥

  अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिता: । ये भूता विघ्नकर्तारस्तेनश्यन्तु शिवाज्ञया ॥३॥

  असे म्हणून अक्षता घेऊन आपल्याभोवती चारी दिशांना फेकाव्यात.

  षडंगन्यास - ॐ यत्पुरुषं व्यदधु: कातिधाव्यकल्पयन्‍ मुखं किमस्य कौ बाहू का  ऊरु पादा उच्येते । हृदयाय नम:।

  हृदयाला हात लावावा

  ॐ ब्राह्मणोऽस्य मुखमासी द बाहू राजन्य: कृत: ऊरु तदस्य यद‍ वैश्य: पद्‍भ्यां शूद्रो अजायत । शिरसे स्वाहा।

  मस्तकाला स्पर्श करावा

  ॐ चंद्र्मा मनसो जातश्चक्षो : सूर्यो अजायत । मु खांदिद्श्चाग्निश्च प्राणाद्‍वायुरजायत । शिखायै वषट्‍।

  शेंडीला स्पर्श करावा

  ॐ नाभ्या आसीदन्तरिक्षं  शीर्षणो  द्यौ: समवर्तत पदभ्यां भूमिर्दिश: श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन्‍ । कवचाय हुं ।

  दोन्ही हातांनी हृदयाच्या खालच्या बाजूला स्पर्श करावा

  ॐ सप्तास्यासन्‍ परिधयस्त्रि :सप्त समिध: कृता:। देवा यद्यज्ञम  तन्वाना अबघ्नन्‍ पुरुषं पशुं । नेत्रत्रयाय वौषट्‍ ।

  डोळ्यांना स्पर्श करावा

  ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवस्तानि धर्माणि प्रथमान्यासन । तेह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा: अस्त्राय फट्

  असे म्हणून टाळी वाजवावी व 'इति दिग्बंध:' असे म्हणावे

 

कलशपूजा –

कलशस्य मुखे विष्णु: कंठे रुद्र: समाश्रित: मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा: स्मृता: ॥

  कुक्षौ तु सागरा: सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा   । ऋग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदो ह्यथर्वण: । अंगैश्च सहिता: सर्वे कलशं तु समाश्रिताः ।

  अत्र गायत्री सावित्री शांतिः पुष्टिकरी तथा । आयांतु देविपूजार्थ दुरितक्षयकारकाः ॥

  गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वती । नर्मदे, सिंधु, कावेरि जलेऽस्मिन्‌ सन्निधिं कुरु ॥

  श्रीवरुणाय नमः । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि ॥

  शुद्ध पाण्याने भरलेल्या कलशाला गंध, अक्षता व फुले वाहावी.

 

शंखपुजा - शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता । पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगासरस्वती ॥

  त्वं पुरा सागरोत्पन्नौ विष्णुना विधृतः करे । अग्रतः सर्वदेवानां पांचजन्य  नमोऽस्तुते ॥

  शंखदेवयायै नमः । सर्वोपचारार्थे गंध-पुष्प-तुलसीपत्रं समर्पयामि ॥

  गंध, फुले, तुलसी शंखाला अर्पण करावी.

 

घंटापूजा -

  आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां । कुर्वे घंटा रवं तत्र देवताऽव्हानलक्षणम्‌ ॥

  घंटायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥

  घंटेला गंध, अक्षता, फुले वाहावी व घंटा वाजवावी.

 

दीपपूजा -

  भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यः । अतस्त्वां स्थापयाम्यत्र मम शांतिप्रदो भवो ॥

  दीपदेवतायै नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥

  समईला गंध, अक्षता, फूल वाहावे. नमस्कार करावा.

 

मंडप पूजा -

  घटस्थापना करावयाच्या जागी वर लहानशी मंडपी आंब्याचे डहाळे वगैरें नीट सुशोभित अशी तयार करतात.

  या मंडपीला देवतास्वरूपी मानून तिची पूजा करतात.

  श्री मंडपदेवतायै नमः । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥

  (मंडपाला गंध, अक्षता, फुले वाहावी.)

 

प्रोक्षण -

  अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा । यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यंतरः शुचिः ॥

  (स्वतःच्या मस्तकावर व पूजासाहित्यावर तुलसीपत्राने किंवा फुलाने पाणी शिंपडावे.)

 

घटस्थापना

आपल्या घरात कुलदेवतेच्या किंवा नित्य पूजेच्या देवांच्या उजव्या बाजूस तांबडया मातीची वेदी तयार करावी.

त्यावर कलश ठेवण्यापूर्वी प्रथम वेदीची प्रार्थना करताना म्हणावे-

ॐ महीद्यौः पृथ्वि चन इमं यज्ञ मिमिक्षितां । पिपृर्तानो भरी मभिः॥

कलशात वारुळ, गोठा  इत्यादी पवित्र ठिकाणची माती घालावी. म्हणावे-

ॐ स्योना पृथ्वि भवानृक्षरानिवेशवीः । यच्छानः  शर्मसप्रथ: ॥

नंतर ॐ इमं मे गंगे यमुने सरस्वती। शुतुद्रिस्तोमं सचता परुष्ण्या ।

असिकन्या मरुद वृधे वितस्तयार्जीकिये शृणुह्या सुषोमया॥

हा मंत्र म्हणावा आणि कलशात पाणी घालावे.

 

ॐ गंधद्वारां दुराधर्षा नित्यपुष्टां करीषिणीं । ईश्वरीं  सर्वभूतानां तामिहोपव्हये श्रियम् ॥

हा मंत्र उच्चारुन कलशात गंध घालावे.

 

ॐ या औषधीः पूर्वाजाता देवभ्यस्त्रियुगं पुरा । मनैनुबभ्रूणामहं शतं धामानि सप्त च ॥

हा मंत्र म्हणावा आणि कलशात हळ्द, आंबेहळद, नागरमोथा इत्यादी औषधी घालावी.

 

नंतर कलशात दूर्वा घालाव्या. त्या वेळी म्हणावे-

ॐ कांडात् कांडात् प्ररोहंती परुषः परुषस्परि।एवा नो दुर्वे  प्रतनु  सहस्त्रेण शतेन च ॥

 

दोन  सुपाऱ्या  कलशात घालून मंत्र म्हणावा-

ॐ याः फलिनीर्या अफला अपुष्पा याश्च पुष्पिणीः । बृहस्पतिप्रसूता   स्तानो मुञ्चन्त्वंहसः ॥

 

कलशात पाच नाणी घालून म्हणावे -

ॐ स हिरत्‍नानि दाशुषे सुवाति सविता भगः । तं भागं चित्रमीमहे ॥

 

नंतर कलशात रुप्याचे किंवा सोन्याचे नाणे घालावे. म्हणावे-

ॐ हिरण्यरुपः सहिरण्य  संद्रुगपान्नपात्सेदु       हिरण्यवर्ण:  ।

हिरण्ययात् परियोनेर्निषद्या हिरण्यदाददत्यन्नमस्मै ॥

 

कलशात गंधाक्षता, हळद्कुंकू आणि पंचामृत घालावे. ह्या वेळी म्हणावयाचा मंत्र -

ॐ युवासुवासाः परिवीत आगात्। स उ श्रेयान् भवति जायमानः ॥

तं धीरासः कवय उन्नयंति । स्वाध्योऽऽऽ मनसा देवयंत ॥

 

पाच पाने असलेली आंब्याच्या पानांची डहाळी कलशावर ठेवावी. म्हणावे -

ॐ अश्वत्थेवो निषदनं पर्णेवोवसतिष्कृता । गोभाजइत्किलासथ यत्सवनथ पुरुषं ॥

 

पूर्णपात्र म्हणजे ताम्हणात तांदूळ भरुन ते पात्र कलशावर ठेवताना म्हणावे-

ॐ पूर्णा दर्वि परापत सुपूर्णा पुनरापत । वस्ने विक्रीणावहा इषमूर्जे शतक्रतो ॥

याप्रमाणे कलशस्थापना करावी. हीच घटस्थापना. पहिल्या दिवशी प्रतिपदेस घटस्थापना करुन तो घट पुढे नऊ दिवस तसाच ठेवायचा असतो.

 

कलशस्थापनेनंतर कलशावरील ताम्हनातील तांदुळावर कुंकवाने अष्टदल काढावे आणि

'श्रीवरुणाय नमः। सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ॥'

असे म्हणावे.

त्या कलशाला गंध, अक्षता, फूल वाहावे. नंतर त्या ताम्हनावर देवीची मूर्ती किंवा आपल्या कुलदेवतेची मूर्ती ठेवावी. म्हणजे देवतास्थापन पूर्ण झाले.

 

अंकुरारोपण -

घटस्थापना झाल्यावर त्या घटाभोवती  माती पसरावी. त्या मातीत नवधान्य,  पेरावे. त्यावर पुनः माती पसरावी आणि म्हणावे -

ॐ स्योना पृथिविभवाभृक्षरानिवेशवी । यच्छानः शर्मसप्रथः ॥१॥

ॐ येन तोकाय तनयाय धान्यं । बीजं वहध्वे आक्षितं । अस्मभ्यं तध्दत्तन यद्वईमहे राधो विश्वायु सौभागम् ॥२॥

ॐ पर्जन्याय प्रगायत दिवस्पुत्राय मीळहुषे । स नो यवसमिच्छ्तु ॥३॥

ॐ वर्षतु ते विभावरि दिवो अभ्रस्य् विद्युतः । रोहंतु सर्व बीजान्यव ब्रह्मद्विषो जहि ॥४॥

 

घटप्रार्थना –

देवदानवसंवादे मध्यमाने महोदधौ । उत्पन्नोऽसि तदा कुंभ विधृतो विष्णुना स्वयम्॥

त्वत्तोये सर्व तीर्थानि देवाः सर्वे त्वयि स्थिताः । त्वयि तिष्ठन्ति भूतानि त्वयि प्राणाः प्रतिष्ठिता ॥

शिवः स्वयं त्वमेवासी विष्णुस्त्वंच प्रजापति: । आदित्या वसवो रुद्रा विश्वेदेवाः सपैतृका ॥

त्वयि  तिष्ठन्ति सर्वेऽपि यतः कामफलप्रदाः । त्वत्प्रसादादिमां  पूजां  कर्तुमीहे जलोद्भव ॥

सांनिध्यं कुरु मे देव प्रसन्नो भव सर्वदा ॥

आगच्छ वरदे देवि दैत्यदर्पनिषूदनि । पूजां गृहाण सुमुखि नमस्ते शंकरप्रिये ॥

सर्वतीर्थमयं वारि सर्व देव समन्वितम्। इमं घट समागच्छ सांनिध्यमिह कल्पया ॥

           

दीप स्थापना पूजा --

नंदादीप घटाजवळ नऊ दिवसपर्यंत अखंड तेवत ठेवणे हा नवरात्र पूजेतील अत्यंत महत्त्वाचा विधी आहे.

ॐ ऐं र्‍हीं श्रीं वास्तुपुरुषाय नमः । गंधाक्षतापुष्पं समर्पयामि ॥

हा मंत्र म्हणावा व ज्या जागी हा दीप ठेवायचा त्या स्थलाची गंध, अक्षता, फूल वाहून पूजा करावी.

 

नंतर समई किंवा नंदादीपाची गंध, अक्षता, फूल वाहून पूजा करावी व म्हणावे-

ॐ ऐं र्‍हीं श्रीदीपाय नमः । गंधाक्षत-पुष्पं समर्पयामि ॥

अखंड दीपकं देव्याः प्रीतये नवरात्रकम्। उज्ज्वालये अहोरात्रमेकचित्तो दृढव्रतः ॥

अस्मिन् क्षेत्रे दीपनाथ निर्विघ्नसिध्दिहेतवे । लक्ष्मीयंत्रस्य पूजार्थमनुज्ञां दातुमर्हसि ॥

 

 

           

श्रीमहाकाली-श्रीमहालक्ष्मी-श्रीमहासरस्वती स्थापना

श्रीमहाकाली-श्रीमहालक्ष्मी-श्रीमहासरस्वती या तीन देवींची  तसेच कुलदेवतेची  स्थापना कलशावरील ताम्हनात त्यावर कुंकुमाक्षता वाहू न करावी आणि म्हणावे-

खड्‌गं चक्रगदेषुचाप परिधान शूलं भुशुंडी शिरः । शंखं संदधतीं  करै स्त्रिनयनां सर्वांगभूषावृताम्॥

नीलाश्मद्युतिमास्य पाददशकां सेवे महाकालिकां । यामस्तौत्त्वपिते हरौ कमलजो हंतुं मधु कैटभम् ॥१॥

श्रीमहाकाल्यै नमः । श्रीमहाकाली आवाहयामि-स्थापयामि॥

अक्षस्त्रक्परशुं   गदेषु कुलिशं    पद्मम    धनुषकुन्डीकां   । दंडं शक्तिमसिं च चर्मजलजं घंटां सुराभाजनम्॥

शूलं पाश सुदर्शनेच दधती हस्तैः प्रवालप्रभां । सेवे  सैरिभमर्दिनीमिह महालक्ष्मी सरोजस्थिताम् ॥२॥

श्री महालक्ष्म्यै नमः।श्रीमहालक्ष्मी आवाहयामि-स्थापयामि॥

घंटाशूल हलानि शंख मुसले चक्रं धनुः सायकं । हस्ताब्जैर्दधतीं धनांतविलसच्छीतांशुतुल्यप्रभां॥

गौरीदेहसमुद्‌भवां त्रिजगतामाधारभूतां  महां । पूर्वामत्र सरस्वतीमनुभजे शुंभादिदैत्यार्दिनीम् ॥३॥

श्री महासरस्वत्यै नमः। श्री महासरस्वती आवाहयामि-स्थापयामि॥

 

नवदुर्गा स्थापना

नवदुर्गा ही देवता तिच्या नावाप्रमाणे श्रीदुर्गादेवीच्या नऊ नावांनी संबोधिली जाते. नवदुर्गा स्थापना करताना कलशावरील ताम्हणात नऊ सुपार्‍या पूर्वेकडून क्रमाने

 

एकेक ठेवून त्यावर कुंकुमाक्षता वाहाव्या आणि मंत्र म्हणावे -

जगत्पूज्ये जगद्‌वंद्ये सर्वशक्तिस्वरुपिणीं । पूजां गृहाण कामारिजगन्मातर्नमोऽस्तु ते ॥

शैल्यपुत्र्यै नमः । शैलपुत्रीं आवाहयामि-स्थापयामि ॥१॥

त्रिपुरां त्रिगुणाधारां मार्गज्ञान स्वरुपिणीं । त्रैलोक्यवंदितां देवीं त्रिमूर्ति पूजयाम्यहम्॥

ब्रह्मचारिण्यै नमः । ब्रम्हचारिणीं आवाहयामि-स्थापयामि ॥२॥

कालिकां तु कालातीतां कल्याणह्रदयां शिवां । कल्याणजननी नित्यं कल्याणी पूजयाम्यहम्॥

चंद्रघंटायै नमः । चंद्रघंटा आवाहयामिस्थापयामि ॥३॥

आणिमादिगुणोदारा मकराकारचक्षुषां । अनंतशक्तिभेदां तां कामाक्षीं पूजयाम्यहम्॥

कूष्मांडायै नमः । कूष्मांडा आवाहयामि-स्थापयामि ॥४॥

चंडवीरां चंडमायां चंडमुंड प्रभंजिनीम  । तां नमामि च देवेशीं चंडिकां पूजयाम्यहम्॥

स्कंदमात्रै   नमः । स्कंदमातरं आवाहयामि-स्थापयामि ॥५॥

सुखानंदकरां शांता सर्वदेवनमस्कृतां । सर्वभूतात्मिकां देवीं शांभवीं पूजयाम्यहम्॥

कात्यायन्यै नमः । कात्यायनीम् आवाहयामि-स्थापयामि ॥६॥

चंडवीरा चंडमाया चंडमुंडप्रभंजिनीम्। तां नमामि च देवेशीं गायत्री पूजयाम्यहम्‌॥

कालरात्र्यै नमः । कालरात्रि आवाहयामि-स्थापयामि) ॥७॥

सुंदरी स्वर्णवर्णांगी सुखसौभाग्यदायिनीम् । संतोषजननी देवीं सुभद्रां पूजयाम्यहम्॥

महागौर्यै नमः। महागौरी आवाहयामि-स्थापयामि ॥८॥

दुर्गमे दुस्तरे कार्ये भय दुर्गविनाशिनीम्। पूजयामि सदा भक्त्या दुर्गा दुर्गर्तिहारिणीम्॥

सिध्दिदात्र्यै नमः। सिध्दिदायै नमः। सिध्दिदां आवाहयामि-स्थापयामि ॥९॥

 

प्राणप्रतिष्ठा -

देवता स्थापन झाल्यावर या प्रतीकात देवतासंचार व्हावा म्हणून दृष्टी समोरील घटाकडे स्थिर ठेवून म्हणावे-

रक्तांभोधिस्थपोतोल्लसदरुणसरोजाधिरुढा कराब्जैः । पाशं कोदंडामिक्षूद्भवमथ गुणमप्यंकुशं पंचबाणान्॥

बिभ्राणां सृक्लपालं त्रिनयनलसिता पीनवक्षोरुहाढया । देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्तिः परा नः ॥

 

नंतर ॐ हे अक्षर (याला प्रणव म्हणतात ) पंधरा वेळा उच्चारावे. त्या वेळी उजवा हात छातीकडे व दृष्टी समोरच्या घटाकडे असावी. नंतर या संचारित देवतांना साखरेचा नैवेद्य दाखवावा.

 

ध्यान –

देवता स्थापना झाल्यावर देवीचे ध्यान करावे. 'अथ ध्यानम्' असे म्हणून ध्यानमंत्र उच्चारण करावा

विद्युद्दामसमप्रभां मृगपतिस्कंधस्थितां  भीषणाम्। कन्याभि: करवालखेटविलसध्दस्ताभिरासेविताम्॥

हस्तैश्चक्रदरालिखेट विशिखांश्चापं  गुणं तर्जनीम्। बिभ्राणामनलात्मिका शशिधरां दुर्गा त्रिनेत्रां भजे ॥१॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवताभ्यो नमः।ध्यायामि ।

 

आवाहन -

आवाहन करताना म्हणावे -        

हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥

तप्तकांचनसंकाशं मुक्ताभरणभूषिताम्‌ । रत्नसिंहासनासीनां वन्दे देवीं महेश्वरीम्‌ ॥

श्रीमहाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: । आवाहनं समर्पयामी ।

 

आसन -

देवतांना आसन देताना म्हणावे.-

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् ॥

खडगशूल गदाहस्तामभयं दधतीं करै । गजारुढां महादेवीं सर्वैश्चर्य   प्रदायिनीम्‌ ॥

श्रीमहाकाली - महालक्ष्मी-महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: । आसनं समर्पयामि किंवा आसनार्थे अक्षतां समर्पयामि ॥

अक्षता वाहाव्या

 

पाद्य –

अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् ।
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम् ॥

विद्याधरीं महादेवी पद्‍माभां लोकनायकाम् । सर्वेश्वर्य्प्रदां देवी महालक्ष्मी प्रपूजये ॥

श्रीमहाकाली- महालक्ष्मी -महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: । पाद्यं समर्पयामि

देवतांना पाय धुण्यासाठी पळीभर पाणी द्यावे.

 

वन्दे देवीं महेश्वरीम्‌ ॥ श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: ।

आवाहनं समर्पयामि ॥

 

अर्ध्य -

गंध , अक्षता , पुष्पमिश्रित पळीभर पाणी हात धुण्यासाठी द्यावे आणि म्हणावे -

कां सोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तींतृप्तां तर्पयन्तीम् ।
पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम् ॥

दधिदूर्वाक्षतायुक्तं गंगातोय समन्वितं । अर्ध्य गृहाण भो देवि मया भक्त्या निवेदितम्‌‍ ॥

श्रीमहाकाली - महालक्ष्मी- महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: । अर्ध्य समर्पयामि ॥

 

आचमनीय -

चूळ भरण्यासाठी , पिण्यासाठी शुध्द पाणी पळीने देताना म्हणावे.

चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोकेदेवजुष्टामुदाराम् ।
तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मेनश्यतां त्वां वृणे ॥

नानारत्नप्रभां देवीं नानागणसमन्वितां । नारायणी महालक्ष्मी वन्दे तां विष्णुवल्लभाम्‍ ॥

श्रीमहाकाली -महालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: । आचमनीयं समर्पयामि ॥

           

स्नान -

स्नानासाठी पळीभर पाणी अर्पण करावे म्हणावे-

आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तववृक्षोऽथ बिल्वः ।
तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्चबाह्या अलक्ष्मीः ॥

गंगा - सरस्वती -रेवा - पयोष्णी - नर्मदाजलै । स्नापितोऽसि मया देवी तथाशांति कुरुष्व मे ॥

श्रीमहाकाली -महालक्ष्मी- महासरस्वती - नवदुर्गा - देवताभ्यो नम: । स्नानं समर्पयामि ॥

           

पंचामृतस्नान -

दुध - दही - तूप - साखर  मध हे पाच पदार्थ एकत्र करुन ते पळीने वाहावे. म्हणावे-

पयोदधि घृतं चैव शर्करामधुसंयुतं । पंचामृत समानीतं त्वं गृहाण सुरेश्वरि ॥

श्रीमहाकाली - महालक्ष्मी-महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: पंचामृतस्नानं समर्पयामि ॥

           

गंधोदकस्नान –

सुगंधासाठी पळीभर पाणी घेऊन त्यात गंध घालावे व वहावे-

गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ।
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥

कर्पू रै लासमायुक्तं सुगंधिद्र्व्यसंयुतं । गंधोदकं मयादत्तं स्नानार्थ प्रतिगृह्यताम्‍ ॥

श्रीमहाकाली महालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: । गंधोदकस्नानं समर्पयामि ॥

 

 

 

शुध्दोदकस्नान -

शुध्द पाणी पळीने वाहावे, म्हणावे -

ॐ आपोहिष्ठा मयोअभुवस्तानऊर्जेदधातन । महेरणायचक्षसे । योव: शिवतमो रसस्तस्य भाजयते ह न: उशतीरिवमातर: ।

तस्मा अरंगामामवो यस्यक्षयाय जिन्वथ । आपो जनयथाच न: ।

श्रीमहाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: । शुध्दोदकस्नानं समर्पयामि ॥

 

स्नानोत्तर स्वल्पपूजा-

स्वल्पपूजा ही स्नान झाल्यावर करावयाची असते

श्रीमहाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: । आचमनीअयं समर्पयामि ।

ताम्हनात पळीभर पाणी सोडावे.

 

धूप समर्पयामि ।

उदबत्ती ओवाळून घंटा वाजवावी

 

दीपं समर्पयामि ।

नीरांजन ओवाळून घंटा वाजवावी

 

नैवेद्यार्थ पंचामृतशेषनैवेद्यं समर्पयामि ॥

शेष पंचामृतचाच नैवेद्य दाखवावा

 

ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा | ॐ ब्रह्मणे   स्वाहा ॥

नमस्कार करावा

 

इथे पूजेचा अर्धा भाग पूर्ण होतो म्हणून तद्‍नुषंगिक प्रार्थना करावी.

अनेन पूर्वाराधेन श्रीमहाकाली महालक्ष्मी-महासरस्वती - महासरस्वती - नवदुर्गा देवता: प्रीयताम्‍ ।

ॐ तत्सत्‍ ब्रह्मार्पणमस्तु । विष्णवे नमो: । विष्णवे नमो: विष्णवे नमो: ॥

           

महाभिषेकस्नान

नऊ दिवसपर्यत घट हलवायचा नसतो . त्यामुळे अभिषेक करताना फुलाने किंवा तुलसीपत्राने पाणी शिंपावे आणि श्रीसूक्ताची एक आवृत्ती फलश्रुतीसह म्हणावी,

पळीभर पाणी ताम्हनात सोडावे आणि म्हणावे -

ॐ देवस्यं त्वा सवितु: प्रसवेऽश्विनो बाहुभ्यां पुष्णो हस्ताभ्यामग्रस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्र्स्येद्रियेणाभि्षिञ्चामि।

बलायश्रियै यशसऽन्नाद्याय ॥ ॐ भूर्भुवस्व: अमृताभिकोऽस्तु।शांति: पुष्टिस्तुष्टिश्र्चास्तु ॥

श्रीमहाकाली- श्रीमहालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: ।

महाअभिषेकस्नानंसमर्पयामि । महाअभिषेकस्नानानंतरेण आचमनीयं समर्पयामि ॥

           

 

 

वस्त्र –

उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह ।
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातुमे ॥

मुक्तामणि गणास्पर्श - स्फुरत्‍ कं चुकमुत्तमं । पीतांबर सोत्तरीयं गृहाण परमेश्वरी ॥

श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती-

नवदुर्गा देवताभ्यो नम: । वस्त्रार्थे कार्पासवस्त्रे समर्पयामि ॥

दोन कापसाची वस्त्रे समर्पण करावी

           

उपवस्त्र –

क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।
अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् ॥

नानासिध्दिप्रदां देवीं नानागुणविवर्धिनीं । नाना सूत्रधरां देवी सर्वलोकमहेश्वरी ॥

श्रीमहाकाली - महालक्ष्मी- महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: ।

उपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रे ( किंवा तद्‍भावे ) अक्षतान्‍ समर्पयामि ॥

अक्षता वाहाव्या

           

कंचुकी - कंठसूत्र -

कंचुकी म्हणजे चोळी, कंठसूत्रे म्हणजे मंगलसूत्रे अर्पण करणे

ॐ तप्तकांचनसंकाशा महालक्ष्मी वरप्रदाम्‍ । नानाभरणशोभाढयां वंदे त्वां वरदासनाम ।

श्रीमहाकाली-महालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: ।

कंचुकीं समर्पयामि ( किंवा तद्‍भावे ) कंचुक्यार्थ अक्षतान समर्पयामि ॥

अक्षता वाहाव्या

ॐ महागुणसमायुक्तं नानामणिसमन्वितम्‍ । कंठसुत्र मयानीतं गृहाण भक्तवत्सले ॥

श्रीमहाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: । कठसुत्रं समर्पयामि ॥

मंगलसूत्र समोरील कलशाला बांधावे.

           

काकणे -

ॐ काचस्यनिर्मितं दिव्यं कंकणच सुरेश्चरि । हस्तालंकारणार्थाय कंकण प्रतिगृह्यताम‍ ॥

श्रीमहाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: । कंकण समर्पयामि ॥

काकणे समर्पण करावी

           

सौभाग्यद्रव्ये -

हळद-कुंकू काजळ- मंगळसूत्र - काकणे हे अलंकार स्त्रियांना अत्यंत प्रिय , भूषणभूत आणि मंगलकारक आहेत. या देवतांनादेखील ते प्रिय आहेत. हे अलंकार अवश्य समर्पण करावे.

           

हळद -

ॐ हरिद्रास्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी । सर्वालंकारमुख्याहि देवि त्वं प्रतिगृह्यताम्‍ ॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती - नवदुर्गा - देवताभ्यो नम: । हरिंद्रा समर्पयामि

हळद वाहावी

           

कुंकू -

ॐ हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकम्‍ । वस्त्रालंकारणं सर्वं देवि त्वं प्रतिगृह्यताम्‍ ॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती- नवदुर्गा देवताभ्यो नम: । कुंकुमं समर्पयामि |

कुंकू वाहावे

           

सिंदूर -

ॐ उदितारुण्संकाशं जपाकुसुमसन्निभम्‍ । सीमंतभूषणर्थाय सिंदूर प्रतिगृह्यताम्‍ ॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: । सिंदूरं समर्पयामि ॥

सिंदूर वाहावा

           

काजळ-

ॐ कज्जलं कामिकं रम्यं कामिनीकामसंभवम्‍ । नेत्रयोर्भूषणार्थाय कज्जलं प्रतिगृह्यताम्‍ ।

श्रीमहाकाली - महालक्ष्मी - महासरस्वती - नवदुर्गा देवताभ्यो नम: । कज्जलं समर्पयामि |

काजळ वाहावे

 

चंदन-

गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ।
ईश्वरींग् सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥

चंदनागरुकर्पूर-कुंकुमारोचनैस्तथा । कस्तूर्यादि सुगंधंच सर्वागेषु विलेपये ॥

श्रीमहाकाली - महालक्ष्मी-महासरस्वती- नवदुर्गा देवताभ्यो नम: । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि

           

चंदन लावावे.

गंध वाहावे. नमस्कार करावा

 

फुले-

फुले, बिल्वपत्रे, दुर्वा, तुलसीपत्रे इत्यादी समर्पण करताना म्हणावे –

मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि ।
पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥

मंदारपारिजातादि पाटली केतकानि च । जाति चंपक पुष्पाणि गृहाणेमानि शोभने ॥

पद्‌म शंखज पुष्पादिशतपत्रे र्विचित्रतां । पुष्पमालां प्रयच्छामि गृहाण त्वं सुरेश्वरि ॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवताभ्यो नमः। यथा कालोद्भव पुष्पाणि समर्पयामि।

बिल्वपत्रं-तुलसीपत्रं दुर्वांकुराणि च सरर्पयामि। पुष्पमालां च समर्पयामि ।

पुष्पहार घटाला (कलशाला) बांधावा.

 

अंगपूजा -

देवीच्या नावांचा व अंगोपांगांचा उच्चार करुन अक्षता वाहाव्यात.

दुर्गायै नमः। पादौ पूजयामि ॥ महाकाल्यै नमः। गुल्फौ पूजयामि ॥

मंगलायै नमः। जानुद्वयं पूजयामि॥ कात्यायन्यै नमः। ऊरु पूजयामि ॥

भद्रकाल्यै नमः। कटिं पूजयामि॥ कमलवासिन्यै नमः । नाभिं पूजयामि

शिवायै नमः। उदरं पूजयामि॥ क्षमायै नमः । ह्रदयं पूजयामि ॥

कौमार्यै नमः। स्तनौ पूजयामि ॥ उमायै नमः। हस्तौ पूजयामि ॥

महागौर्ये नमः। दक्षिणबाहुं पूजयामि ॥वैष्णवै नमः। वामबाहुं पूजयामि॥

रमायै नमः। स्कंधौ पूजयामि ॥ स्कंदमात्रै नमः। कंठं पूजयामि ॥

महिषमर्दिन्यै नमः। मुखं पूजयामि॥

महेश्वर्यै नमः । शिरः पूजयामि ॥

भवान्यै नमः । सर्वांगं पूजयामि ॥

           

धूप समर्पण -

धूप, उदबत्ती इत्यादी समर्पण करताना म्हणावे –

कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम ।
श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ॥

 

दशांगं गुग्गुलं धूपं चंदनागरुसंयुतं। समर्पितं मया भकत्या लक्ष्मि त्वं प्रतिगृह्यताम्॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवताभ्यो नमः । धूपं समर्पयामि ॥

           

दीप समर्पण -

नीरांजन दीप समर्पण करताना म्हणावे –

आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे ।
नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ॥

घृतवर्तिसमायुक्तं महातेजो महोज्ज्वलं। दीपं दास्यामि गिरजे सुप्रीता भव सर्वदा॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवताभ्यो नमः। दीपं समर्पयामि॥

नीरांजन ओवाळावे .

           

नैवेद्य -

दूध, नारळाचे चूर्ण, साखर, केळी इत्यादी पदार्थ शुध्द पात्रात देवीसमोर ठेवून तुलसीपात्राने प्रोक्षण करावे. म्हणावे -

आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥

अन्नं चतुर्विध स्वादुरसै षड्‌भिः समन्वित । नैवेद्यं गृहतां देवि भक्ति मे ह्यचलां कुरु॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवताभ्यो नमः। नैवेद्यार्थे दुग्धनारिकेलफलचूर्ण-शर्करा-रंभाफल नैवेद्यं समर्पयामि॥

ॐ प्राणाय स्वाहा। ॐ अपानाय स्वाहा। ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा।

ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि| हस्तप्रक्षालनं समर्पयामि॥

मुखप्रक्षालनं समर्पयामि । करोद्‌वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ॥

महानैवेद्य समर्पण करताना अन्नपदार्थ वाढलेले पान श्री देवीसमोर चतुष्कोणाकृती मंडल काढून त्यावर ठेवावी आणि प्रोक्षण केलेले तुलसीपत्र नंतर घटावर घालावे.

           

तांबूल -

विडयाच्या दोन पानांवर एक सुपारी ठेवावी आणि म्हणावे -

ॐ पूगीफलं महाद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतम् । कर्पूरै लासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम् ॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवताभ्यो नमः । मुखवासार्थे पूगीफलं-तांबूल समर्पयामि ॥

(पळीभर पाणी विडयावर घालावे.)

           

दक्षिणा -

विडयावर दक्षिणा म्हणून काही नाणी ठेवावी.

हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः । अनंतपुण्यफलदमतः शांति प्रयच्छ मे ।

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवताभ्यो नमः । सुवर्णपुष्प दक्षिणां समर्पयामि ॥

(सुवर्णपुष्प म्हणजे सोन्याचे फूल वाहावे. हे शक्य नसेल तर कुंकुमाक्षता वाहाव्या.)

नारिकेलादि फले - भोजनानंतर फळे, विशेषतः नारळ, बदाम, खारीक इत्यादी अर्पण करताना म्हणावे -

ॐ फलेन फलितं सर्व त्रैलोक्य सचराचरं। तस्मात् फलप्रदानेन सफलाः स्युमनोरथा ॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवताभ्यो नमः । नारिकेलादि फलम् समर्पयासि ॥

नारळावर पळीभर पाणी घालावे.

           

शेषोपचार -

छत्र-चामर-दर्पण-गीत-वाद्य-नृत्य इत्यादी अर्पण करताना म्हणावे-

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवताभ्यो नमः । छ्त्रचामर-दर्पण-गीत-वाद्यादि शेषोपचारान् समर्पयामि ।

(किंवा) सर्वोपचारार्थे अक्षतान् समर्पयामि ॥

कुंकुमाक्षता वाहाव्या .

           

मालाबंधन -

घटावर मंडपीपासून खाली लोंबती विविध फुलांची माला बांधणे हा एक महत्त्वाचा विधी आहे. म्हणावे -

मालाहि सर्व देवानां प्रीतिदा शुभदा यतः । लंबितासौ मया भक्त्या गृहाण जगदंबिके ॥१॥

ग्रथितां तिलकल्हाजातिमंदरचंपकैः। पुष्पमाला प्रयच्छामि प्रथमेन्हि* तवांबिके ॥२॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवताभ्यो नमः । पुष्पमालां समर्पयामि ॥

 

दुस-या दिवशी द्वितीयेन्हि व त्यापुढे तृतीयेन्हि, चतुर्थेन्हि, पंचमेन्हि, षष्ठेन्हि, सप्तमेन्हि, अष्टमेन्हि, नवमेन्हि याप्रमाणे बदल करावा.

 

प्रदक्षिणा -

आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् ।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥

यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च । तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदेपदे ॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवताभ्यो नमः । प्रदक्षिणां समर्पयामि ॥

प्रदक्षिणा स्वतःभोवती फिरुन करावी.

           

नमस्कार -

तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान् विन्देयंपूरुषानहम् ॥

नमस्ते देविदेवेशि नमस्ते ईप्सितप्रदे । नमस्ते देविदेवेशि नमस्ते शंकरप्रिये ॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवताभ्यो नमः । नमस्करोमि ॥

नमस्कार करावा.

           

महानीरांजनदीप -

नीरांजनात मोठया फुलवाती, कापूरारतीत कापूर इत्यादी प्रदीप्त करुन ओवाळावे

ॐ श्रिये जातः श्रिय आनिरीयाय श्रियं वयो जरितृभ्यो ददाति । श्रियं वसाना अमृतत्त्वमायम् भवंति सत्या स मिथामितद्रौ ॥

श्रिय एवैनं तच्छ्रियमा दधाति संततमृचा वषट् कृत्यं । संतत्यै संधीयते प्रजया पशुभिर्य एवं वेद ॥

याज्यया यजति प्रत्तिर्वे याज्या पुण्यैव लक्ष्मीः ।

पुण्यामेव तल्लक्ष्मीं संभावयति पुण्यां लक्ष्मी संस्कुरुते कौशेयवर्ति संयुक्तं गोधृतेन समन्वितं नीरांजन मया द्त्तं गृहाण परमेश्वरि ॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवताभ्यो नमः । महानीरांजनदीपं कर्पूरार्तिक्यं च समर्पयामि ॥

महानीरांजनदीप आणि आर्तिक्यं दीप दाखवताना पंचारतीही ओवाळावी. नंतर आरत्या म्हणाव्या .

           

मंत्रपुष्प -

घटावर सर्वांनी फुले वाहावीत. म्हणावे -

यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् ।
सूक्तं पञ्चदशर्चं च श्रीकामः सततं जपेत् ॥

नमस्ते देविदेवेशि नमस्ते ईप्सितप्रदे । नमस्ते देविदेवेशि नमस्ते शंकरप्रिये ॥

ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि । तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् ॥

श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवताभ्यो नमः । मंत्रपुष्प समर्पयामि ॥

           

राष्ट्रीय प्रार्थना -

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन । ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वेः साध्याः सन्ति देवाः ।

ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे । स मे कामान् कामकामाय मह्यम् । कामेश्वरो वैश्रवणो ददातु ।

कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नमः । ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठयं राज्यं ।

महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात् पृधिव्यै समुद्र्पर्यंताया एकराळिति ।

तदप्येषः श्लोकोऽभिगीतो । मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे । आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा:। सभासद इति ॥

ये वैतां ब्रह्मणो वेद । अमृतेनामृतां पुरीं । तस्मै च ब्रह्मा च आयुःकीर्ति प्रजा ददुः ॥

           

क्षमाप्रार्थना -

श्रीदेवी ह्याप्रमाणे मनोभावे केलेल्या पूजेने प्रसन्न होवो असे मागणे मागावे व प्रार्थना करावी. म्हणावे -

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् । पूजा चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरि ।

मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरि । यत्पूजितं मया देवि परिपूर्ण तदस्तु मे ॥

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम । तस्मात कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वरी ॥

लक्ष्मी त्वत्प्रज्ञया नित्यं कृता पूजा तवाज्ञया । स्थिरा भव गृहे ह्यास्मिन्‌ मम संतानकारिणी ।

न्यूनं वाप्यधिकं वापि यन्मया मोहतः कृतम् । सर्व तदस्तु संपूर्ण त्वत्प्रसादात् महेश्वरि ॥

महिषध्नि महामाये चामुण्डमुण्डमालिनी । द्र्व्यमारोग्यविजयं देहि देवि नमोऽस्तुते ॥

भूतप्रेतपिशाचेभ्यो रक्षोभ्यश्च महेश्वरि । देवेभ्यो मानुषेभ्यश्च भयेभ्यो रक्ष मां सदा ॥

अपराधसहस्त्राणि क्रियंतेऽहर्निशं मया ॥ दासोऽहमिती मां मत्वा क्षमस्व परमेश्वरि । क्षमस्व परमेश्वरि ।

क्षमस्व परमेश्वरि । समर्पण अनेन ध्यानावाहनादि षोडशोपचारपूजनेन भगवती श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा-कुलदेवताः प्रीयताम्‌ ।

ॐ तत्सद् ब्रह्मार्पणमस्तु । विष्णवे नमो । विष्णवे नमो । विष्णवे नमः। उदयोस्तु । जय जगदंब ।

नंतर ॐ केशवाय नमः इत्यादी मंत्र म्हणून दोन वेळा आचमन करावे. अभिषेकाचे किंवा देवीच्या घटाला स्पर्शविलेल्या पाण्याचे तीर्थ प्राशन करावे. त्या वेळी म्हणावे -

अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम् । देवीपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् ॥

 

उत्थापन आणि विसर्जन

नित्याप्रमाणे षोडशोपचार पूजा, महानैवेद्य समर्पण , मालाबंधन इत्यादी विधी समाप्त झाल्यावर नवरात्रौत्थापन-घटोत्थापन करावयाचे असते . त्यासंबंधी माहिती -

(आचमन-प्राणायाम इत्यादी झाल्यावर संकल्प करावा)

 

संकल्प- तिथिर्विष्णुस्तथावारो नक्षत्रं विष्णुरेव च । योगश्चकरणंचैव सर्व विष्णुमयं जगत्॥

अद्य पूर्वोच्चरित वर्तमान एवंगुण विशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ श्रीमहाकाली - महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गादि स्थापितदेवतानां उत्थापनं करिष्ये ।

 

असे म्हणून ताम्हनात पळीने पाणी सोडावे

 

"तथाच पंचोपचार पूजनमहं करिष्ये "

 

असे म्हणून पंचोपचार पूजा करावी.

 

प्रार्थना -

 

दुर्गा शिवा शांतिकरीं ब्रम्हाणी ब्राह्मणप्रियां । सर्वलोकप्रणेत्रीं च तां नमामि सदाशिवम् ॥१॥

विधिहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं यदचिंतं । पूर्ण भवतु तत्सर्व त्वत्प्रसादात् महेश्वरि ॥२॥

 

अशी प्रार्थना करावी. हात जोडावे आणि म्हणावे -

 

"माता क्षमस्व । ॐ दुर्गायै नम: ॥"

 

असे म्हणून कलशावरील ईशान्येच्या बाजूचे एक फूल काढावे आणि विसर्जन मंत्र म्हणावा.

 

 

विसर्जन मंत्र -

 

उत्तिष्ठ देवि चंडेशि शुभां पूजां प्रगृह्य  च । कुरुष्व मम कल्याणमष्टाभि: शक्तिभि: सह ॥

गच्छ गच्छ त्वं  स्वस्थानं परं स्थानं देवि चंडिके । व्रत स्रोतोजतोजलौर्वृध्यै तिष्ठ गेहेच भूतये॥

दुर्गे देवि जगन्माता: स्वस्थानं गच्छ पूजित: । संवत्सरे व्यतीते तु पुनरागमनाय  च  ॥

पूजामिमां मया देवि यथाशक्ति निवेदिताम्‌ । रक्षणार्थ समादाय गच्छ स्वस्थानमुत्तमम् ॥

 

याप्रमाणे प्रार्थना करुन देवीवर अक्षता वाहाव्या व घट हलवावा. घटातील थोडे पाणी काढून घ्यावे व ते कुटुंवातील सर्व मंडळींवर मार्जन करावे.

उदयोस्तु ।

जय जगदंब ।देवीची आरती म्हणावी. देवीची प्रार्थना म्हणावी.